‘पालशेतची विहीर‘ हे मराठी नाटक आद्य मराठी नाटककार स्व. हिराबाई पेडणेकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित आहे. देवदासी समाजातील प्रतिभावंत कलाकार व नाट्यलेखक असलेल्या हिराबाईंना एक यशस्वी नाट्यलेखक, गीतकार व गायक म्हणून कलाक्षेत्रात स्वतःला प्रस्थापित करताना, पुरुषप्रधान संस्कृतीचे व उच्चवर्णीय प्रवृत्तीचे चटके खात कसे जीवन कंठावे लागले याचे विदारक दर्शन या नाट्यकृतीतून केलेले आहे. त्याचबरोबर 19 व्या शतकातील रुढी-परंपरावादी सामाजिक परिस्थितीतसुद्धा सुधारणावादी दृष्टिकोन बाळगून हिराबाईंनी महिला सशक्तीकरणाची उभारलेली मुहूर्तमेढही या नाट्यकृतीतून प्रभावीरित्या सादर केलेली आहे. हा केवळ एका महिलेचा संघर्षमय इतिहास नव्हे, तर संपूर्ण महिलावर्गाला नवीन उर्जा प्राप्त करुन देणारा एक नाट्याविष्कार आहे.